शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:56+5:302021-02-17T04:22:56+5:30
तालुक्यातील ५ मंडळापैकी केवळ ४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शासनास पाठविण्यात आला. मात्र शेती ...
तालुक्यातील ५ मंडळापैकी केवळ ४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शासनास पाठविण्यात आला. मात्र शेती पिकांचे नुकसान झालेल्या वालूर मंडळातील २१ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनूदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. हे अनुदान तात्काळ मिळावे, या मागणीसाठी सेलु तालुका दबाव गटाच्या वतिने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र महसुल प्रशासनाकडून कुठलाही मार्ग काढण्यात आला नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी मंगळवार पासुन साखळी उपोषण करुन प्रशासनाचा निषेध नोंदवत २१ गावातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. यासाठी दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतिश काकडे, इसाक पटेल, जयसिंग शेळके, अँड. देवराव दळवे, सय्यद जलाल, विलास रोडगे, मधूकर सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, गुलाब पौळ, दिलिप शेवाळे, दिलिप मगर, योगेश काकडे, केशव डोईफोडे, अँड. योगेश सुर्यवंशी, रामप्रसाद शिंदे,मुकुंद टेकाळे, उत्तम भाबट, डिगांबर भुजबळ, वसंत काकडे, सखाराम नाटकर,विठ्ठल काळे,लक्ष्मण गायके, डाँ. परमेश्वर लांडे, राजाभाऊ भुजबळ, संतोष भाबट, राजाभाऊ आकात, अशोक आंधळे, शिवाजी शेळके, लक्ष्मण मोरेगावकर यांच्यासह मंडळातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.परभणी येथील उपजिल्हाधिकारी डाँ. संजय कुंडेटकर यांनी जिल्हाधिकारी यांना संबधित विषयावर सविस्तर चर्चा करुन अतिवृष्टि अनुदानापासुन शेतकरी वंचित राहणार नाही असे लेखी अश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.