पालम तहसिलवर धडकला शेतक-याचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 03:50 PM2018-03-26T15:50:01+5:302018-03-26T15:50:01+5:30

गारपीट ग्रस्त शेतक-याना तातडीने मदतीचे वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्या साठी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयावर शेतक-यानी  आक्रोश मोर्चा काढला. 

farmers morcha on Palam tahsil for various demands | पालम तहसिलवर धडकला शेतक-याचा आक्रोश मोर्चा

पालम तहसिलवर धडकला शेतक-याचा आक्रोश मोर्चा

Next

पालम ( परभणी ) : तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-याना तातडीने मदतीचे वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्या साठी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयावर शेतक-यानी  आक्रोश मोर्चा काढला. 

पालम तालुक्यात गारपीट ग्रस्त शेतक-याना मदत वाटपासाठी 21 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे.  पण प्रशासनाने त्याचे अद्यापही वाटप केले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या मदतीचे वाटप करण्यात यावी यासाठी तालुका भाजपा कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी केले. मोर्चा नवा मोंढा, ताडकलस रस्ता, मुख्य चौक, बसस्थानक मार्गे तहसीलवर धडकला. अनूदानाचे वाटप करावे , वगळलेली गावे समाविष्ट करावित , निराधाराना अनूदान देण्यात यावे , पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन करावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसिलदार तेजस्वीनी जाधव यांना देण्यात आले.

मोर्चात गणेशराव रोकडे,  नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे , लक्ष्मणराव रोकडे , गजानन रोकडे ,पं.स. सदस्य अण्णासाहेब किरडे , माधव गिणगीणे , डॉ. रामराव उन्दरे , डॉ.  बडेसाब शेख , अशोक पौळ,  विश्वाभर बाबर , दता घोरपडे , विजय शिंदे,  लिंबाजी टोले , शिवाजी दिवटे , चंद्रकांत गायकवाड,  किशनराव कराळे,  तुकाराम पाटील आदीसह मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.  
 

Web Title: farmers morcha on Palam tahsil for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.