‘कृषी संजीवनी’ कडे शेतकर्‍यांची पाठ; सेलू तालुक्यात शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपये थकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 06:37 PM2017-12-26T18:37:01+5:302017-12-26T18:40:43+5:30

कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्‍यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

Farmers recite 'Krishi Sanjivani'; In Selu taluka, the farmers are tired of Rs 90 crore | ‘कृषी संजीवनी’ कडे शेतकर्‍यांची पाठ; सेलू तालुक्यात शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपये थकले

‘कृषी संजीवनी’ कडे शेतकर्‍यांची पाठ; सेलू तालुक्यात शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपये थकले

googlenewsNext
ठळक मुद्दे सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्‍यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

सेलू/देवगावफाटा (परभणी): कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्‍यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

सेलू तालुक्यामध्ये दुधना प्रकल्प आहे. शिवाय दुधना नदीपात्रातूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. यामुळे तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये कृषीपंपधारक शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन केले जाते. महावितरणच्या वतीने शेतकर्‍यांना वीजपुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून पुरेशी वीज मिळत नाही. शेतकर्‍यांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला कसरत करावी लागत आहे. तालुक्यामध्ये १० हजार ४०० कृषीपंपधारक आहेत. या कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शेतकर्‍यांकडील थकित बिल वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथकांची स्थापना केली होती. तसेच थकित बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरुन थकबाकीमुक्त होण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना सुरु केली. ही योजना शेतकर्‍यांसाठी चांगली असली तरी सेलू तालुक्यात मात्र म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक शेतकर्‍यांकडे ३० ते ४० हजार रुपये थकित बिल असल्याने एकदम एवढे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत होता. एकूण थकबाकीपैकी पाच टप्प्यापैकी पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार होता. परंतु, अनेक शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. 

डिसेंबर अखेर सेलू तालुक्यातील १० हजार ४०० थकबाकीदार शेतकर्‍यांपैकी केवळ १ हजार ४७५ शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून २६ लाखांचा भरणा करण्यात आला. तर अजूनही जवळपास ८ हजार ९२५ शेतकर्‍यांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. दुसरा हप्ता मार्च २०१८, तिसरा हप्ता जून २०१८, चौथा हप्ता सप्टेंबर २०१८ तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यत आहे. त्यामुळे वीज बिल थकबाकीदार शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

शेतकरी सिंचनामध्ये व्यस्त
सेलू तालुक्यामध्ये दुधना नदीपात्रात पाणी सोडले आहे. यापूर्वी डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडले होते. शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देणे सुरु केले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. महावितरणने वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन शेतकर्‍यांना सुरळीत वीज पुरवठा करुन द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

मेश्राम यांनी घेतली बैठक
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत कृषीपंपाच्या थकबाकीचा आढावा सहाय्यक अभियंता आर.आर.मेश्राम यांनी २५ डिसेंबर रोजी घेतला. या बैठकीमध्ये कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवगावफाटा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत विविध समस्यांची बैठक घेत समस्या सोडविण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना त्यांनी दिल्या. 

खंडीत विजेमुळे शेतकरी त्रस्त

महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली असली तरी कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. सुमारे बारा तासांचे भारनियमन ग्रामीण भागात होत आहे. परिणामी पाणी उपलब्ध असतानाही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या धोरणामुळे शेतकर्‍यांत संताप आहे. त्यामुळेच कृषी संजीवनी योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

३१ डिसेंबरपर्यंत योजना सुरु

कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ३ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. काही शेतकर्‍यांनी दोन हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्या शेतकर्‍यांनी १ हजार रुपये रक्कम भरुन योजनेचा लाभ घ्यावा.
- आर. आर. मेश्राम, सहाय्यक अभियंता 

Web Title: Farmers recite 'Krishi Sanjivani'; In Selu taluka, the farmers are tired of Rs 90 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.