कारखान्याचे शेअर घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:55+5:302020-12-27T04:12:55+5:30

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड वाढली आहे. त्यामुळे पुढील वर्षी उस नेण्यासाठी अडचणी येण्याची ...

Farmers rush to get factory shares | कारखान्याचे शेअर घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

कारखान्याचे शेअर घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

Next

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड वाढली आहे. त्यामुळे पुढील वर्षी उस नेण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी चांगला भाव देणाऱ्या साखर कारखान्याचे शेअर घेण्यासाठी धावाधाव करीत आहेत.

पालम तालुक्यात या वर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. अतिवृष्टी झाल्याने पाणीसाठा तुडुंब भरले आहेत. तसेच डिग्री बंधारा काठोकाठ भरल्याने गोदावरीचे पात्र भरलेले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पट्यात व इतर भागात उसाची लागवड प्रचंड प्रमाणात वाढलेली पहावयास मिळत आहे. डिसेंबर महिन्यात अजून लागवडीत भर पडेल या वर्षी लागवड वाढ झाल्याने पुढच्या वर्षी उस नेताना साखर कारखाना अनेक नियम लावण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी साखर कारखाना शेअर खरेदी करून उस नेण्यासाठी नियोजन केले जात आहे. चांगला भाव देण्याऱ्या साखर कारखाना चे शेअर खरेदीला शेतकरी पसंती देत आहेत बळीराजा पूर्णा, २१ शुगर सोनपेठ, नृसिंह पूर्णा, धाराशिव लोहा हे कारखाने आजूबाजूला आहेत तर गंगाखेड शूगर वर प्रशासक नेमणूक करण्यात आल्यान शेअर खरेदी बंद आहे.

Web Title: Farmers rush to get factory shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.