विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:27+5:302021-01-03T04:18:27+5:30
चारही बाजुंचे रस्ते उखडल्याने तारांबळ परभणी: शहरात येण्यासाठी चारही बाजुच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी खोदकाम ...
चारही बाजुंचे रस्ते उखडल्याने तारांबळ
परभणी: शहरात येण्यासाठी चारही बाजुच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. परभणी-गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- वसमत आणि परभणी- पाथरी या चारही मार्गावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करुन वाहतूक योग्य रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी होत आहे.
गांधी पार्क भागात वाहतुकीची कोंडी
परभणी: देशमुख गल्लीतून गांधी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांची गैरसोयी झाली. हा रस्ता अरुंद आहे. या मार्गावर दुपारी १ वाजेच्या सुमारास घंटागाडी तसेच इतर चार-पाच चार चाकी वाहने एकाच ठिकाणी दाखल झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अर्ध्या तासानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.
शहरात वाढला
धुळीचा त्रास
परभणी: शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यांवर धुळीचे लोट उडत असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यातील माती वातावरणात मिसळून धूळ वाढत आहे.
जिल्हा स्टेडियममध्ये वाढल्या असुविधा
परभणी: येथील स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झाल्या आहेत. एकाही खेळासाठी सुसज्ज असे ग्राऊंड उपलब्ध नाही. त्या प्रमाणे आसन व्यवस्थेच्या ठिकाणी टाकलेले पत्रे उडून गेली आहेत. या शिवाय पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.
उसांच्या वाहनांमुळे वाढले अपघात
परभणी: जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असून जिल्ह्याच्या विविध भागातून ट्रॅक्टरद्वारे साखर कारखान्यांवर ऊस आणला जात आहे. एका वाहनात जास्तीत जास्त ऊस बसविण्याचे प्रयत्न होत असून ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या जात आहेत. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन या वाहनचालकांकडून होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.