डिग्रसमधे कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:57 PM2018-09-22T16:57:50+5:302018-09-22T16:59:12+5:30

डिग्रस येथील 40 वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. 

Farmer's suicide due to loan on farm land | डिग्रसमधे कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

डिग्रसमधे कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

Next

पालम (परभणी) : शेतीत सतत होणारी नापीकी व कर्जाचा वाढत जाणारा बोजा सहन न झाल्याने तालुक्यातील डिग्रस येथील 40 वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन  आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. 

पुरभाजी किशन कुरे (40) असे मयत शेतक-याचे नाव आहे. कूरे याना डिग्रस शिवारात दोन एकर 20 आर जमीन होती. या शेतीवर स्टेट बँक ऑफ इंडिया चे 50 हजार व काही खाजगी कर्ज आहे. मागील वर्षी त्याच्या मुलीचे लग्न झाले होते.  शेतात नापीकी होत असल्याने फारसे उत्पादन हाती लागले नाही.  बॅकेचा वसुलीसाठी तगादा व खाजगी कर्ज फेडणे कठीण झाल्याने मागील काही दिवसांपासून ते नैराश्यात होते.  शुक्रवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , दोन मुले असा परिवार आहे. 

Web Title: Farmer's suicide due to loan on farm land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.