संपूर्ण कर्जमाफीसाठी पूर्णायेथील शेतक-यांचे सरणावर बसून उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 07:45 PM2017-12-14T19:45:07+5:302017-12-14T19:45:50+5:30
राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे लेखी हमीपत्र दिले. मात्र संपूर्ण कर्जमाफी शिवाय उपोषण माघारी नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
परभणी : राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे लेखी हमीपत्र दिले. मात्र संपूर्ण कर्जमाफी शिवाय उपोषण माघारी नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मुख्य मागण्यासाठी पूर्णा तालूक्यातील पांगरा ढोणे येथील शेतकरी तूकाराम ढोणे आणि निळा येथील माणिकराव सुर्यवंशी हे बुधवारपासून उपोषण करत आहेत. दोघेही उपोषणासाठी पांगरा शिवारातील गट नं २६५ मध्ये बोंडअळीने बाधीत कापूस पिकात लाकडाच्या सरणावर उपोषण करत आहेत. याची माहिती मिळताच तहसीलदार श्याम मंदनूरकर ,चुडावा पोलीस ठाणेदार मीना कर्डक, यांनी उपोषणार्थ्यांची भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने दोन्ही शेतक-यांना तुमच्या मागण्या जिल्हाधिका-यांना यांना कळवल्या असून उपोषण मागे घेण्या बाबत लेखी पत्र दिले. परंतु; जो पर्यंत राज्य शासन शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करणार नाही तोपर्यत उपोषण चालूच राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. यासोबतच आज पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष शहाजी देसाई, संचालक गजानन धवन, सहकार अधिकारी श्याम कुलकर्णी, शिवाजी डाखोरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
संपूर्ण कर्जमाफी हवी
मराठवाड्यातील शेती व्यवसायाची स्तिथी अतिशय बिकट आहे सम्पूर्ण कर्जमाफी शिवाय शेतकऱ्याची आर्थिक घडी सुधारू शकणार नाही. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी चा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शहाजी देसाईं यांनी व्यक्त केली