शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग, 100 एकर ऊस खाक; शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 03:32 PM2022-03-06T15:32:47+5:302022-03-06T15:32:55+5:30

पालम तालुक्यातील सोमेश्वर व फळा शिवारात ही घटना घडली. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे 200 एकर ऊसाला वाचवण्यात यश आले.

Fierce fire in field due to short circuit, 100 acres of sugarcane burned, incident in Palam, Parabhani | शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग, 100 एकर ऊस खाक; शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान

शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग, 100 एकर ऊस खाक; शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान

googlenewsNext

पालमः परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात आगीमुळे तब्बल 100 एकरावरील ऊस जळून गेल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील फळा व सोमेश्वर शिवारात 6 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शॉटसर्कीट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आग एवढी भीषण होती की, शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन दलास बोलवावे लागले.

शॉर्ट सर्कीटमुळे आग
सविस्तर माहिती अशी की, पालम तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. परिसरातील कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या डोईजड ऊस झाला आहे. तो शेतात तसाच उभा असताना सोमेश्वर व फळा शिवारातील शिवरस्त्यालगत शॉट सर्कीट होवून ऊसाला आग लागली. सुरूवातील आग विझविण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. परंतु आग मोठ्या क्षमतेने लागल्याने शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन दलास पाचारण केले.

शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान
अग्नीशम पथक येपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्यामुळे ही आग वनव्यासारखी एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ लागली. ती वाळलेल्या पाचटीमुळे विझविता आली नाही. आगीचे मोठ, मोठे लोळ निर्माण होऊ लागले. या आगीच्या भक्षस्थानी जवळपास 100 एकरावरील ऊस सापडला. परिमाणी, फळा आणि सोमेश्वर गावातील जवळपास 50 हून अधिक शेतकऱ्यांचा ऊस खाक झाला. सर्वांचे मिळून 1 कोटी रूपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

200 एकर ऊस थोडक्यात वाचला
रविवारी दुपारी 2.15 वाजेपर्यंत आग विझली नव्हती. वणवा पाहण्यासाठी दोन्ही गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. अद्याप महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. परंतु पालम पोलिस ठाण्याचे पोनि प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी धाव घेवून शेतकऱ्यांना  सूचना दिल्या आहेत. या परिसरात आणखी 200 एकर ऊस असल्याची माहिती फळा गावचे सरपंच अंगद पौळ यांनी दिली. 
 

Web Title: Fierce fire in field due to short circuit, 100 acres of sugarcane burned, incident in Palam, Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.