वंचितांसाठी लढणे हाच खरा आंबेडकरी विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:33+5:302021-01-18T04:15:33+5:30
परभणी : गोरगरीब, वंचित, पीडितांसाठी लढणे हाच खरा आंबेडकरी विचार आहे आणि या विचारसरणीला धरून मी कार्य करीत आहे, ...
परभणी : गोरगरीब, वंचित, पीडितांसाठी लढणे हाच खरा आंबेडकरी विचार आहे आणि या विचारसरणीला धरून मी कार्य करीत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.
युवा रिपब्लिकन सेनेच्या वतीने १६ जानेवारी रोजी आयोजित क्रांतिज्योती महोत्सव व नामविस्तार वर्धापन दिन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना हत्तीअंबिरे बोलत होते. येथील कृष्णा गार्डन येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव जमदाडे, माजी सभापती रवी सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर, बी. एच. सहजराव, युवराज धसाडीकर, अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, गौतम मुंढे, डॉ.धर्मराज चव्हाण, नितीन सावंत, बबनअण्णा मुळे, आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपप्रसंगी विजय वाकोडे म्हणाले, क्रांतिज्योती महोत्सव हा लोकनायकांचा अभिवादन, समर्पण व कृतज्ञता याचा त्रिवेणी संगम आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या हस्ते झाले. रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष आशिष वाकोडे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. नामविस्तार दिनानिमित्त १७ वर्षे संघर्ष करणारे विजय वाकोडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वल्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन साऊथ कोरियाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा क्रांतिज्योती महोत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मेघानंद जाधव यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. राहुल वहिवाळ यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. आशिष वाकोडे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद घुसळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सुनील तुरुकमानेझ, राजकुमार सूर्यवंशी, ॲड. राजपाल साबळे, सोहम खिल्लारे, प्रवीण गायकवाड, संजय खिल्लारे, चंद्रकांत लहाने, सुधाकर वाघमारे, सिद्धार्थ कसारे, नीलेश डुमणे, परमेश्र्वर कांबळे, सुरेश काळे, हर्षवर्धन काळे, प्रशांत तळेगावकर, खमर फुलारी, वैजनाथ जाधव, शाहीर चंद्रकांत दुधमल, दीपक ठेंगे, अविनाश अंबोरे, महेंद्र गाडेकर, शरद चव्हाण, सुकेशनी गायगोधने, आदींनी प्रयत्न केले.