दहावी विज्ञानाच्या पेपर फुटीप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 05:52 AM2018-03-17T05:52:31+5:302018-03-17T05:52:31+5:30
दहावीच्या परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर बुधवारी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी गंगाखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी दिली.
परभणी : दहावीच्या परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर बुधवारी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी गंगाखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी दिली.
१४ मार्च रोजी दहावीचा विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधी व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाला होता. यासंदर्भात कुंडगीर यांनी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज गुरुवारी दिला
होता.
शुक्रवारी कुंडगीर यांनी केलेल्या सखोल चौकशीत राणीसावरगाव शाळेच्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले.