मृत्यूप्रकरणी बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:03+5:302021-03-14T04:17:03+5:30
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील बद्रीनाथ कुंडलीकराव राऊत हे १५ फेब्रुवारी रोजी जिंतूर ...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील बद्रीनाथ कुंडलीकराव राऊत हे १५ फेब्रुवारी रोजी जिंतूर मार्गे औरंगाबाद येथे मुलीला भेटण्यासाठी जात होते. ते जिंतूर बस स्थानकात दुपारी आले. यावेळी वसमत-औरंगाबाद ही एमएच ०९ एफएल ०५५१ ही बस स्थानकावर आली. यावेळी बसमध्ये जागा धरण्यासाठी जात असताना या बसच्या चालकाने बस पाठीमागे घेत असताना राऊत यांना जोराची धडक दिली. या अपघातात बद्रीनाथ राऊत हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात व नंतर औंरगाबाद येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले होते. याप्रकरणी १२ मार्च रोजी मयत बद्रीनाथ राऊत यांच्या पत्नी गंगूबाई बद्रीनाथ राऊत यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात हयगयी व निष्काळजीपणा करून बस चालवत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एमएच ०९ एफएल ०५५१ या एसटी बसच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.