परभणी, मानवत, गंगाखेडमध्ये गुन्हे दाखल; मदरशांना दिलेल्या विकास अनुदानामध्ये केला अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:36 AM2018-09-29T00:36:48+5:302018-09-29T00:37:52+5:30
डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानात अपहार केल्या प्रकरणी परभणी, मानवत व गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केलेल्या चौकशीत अनुदानात अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानात अपहार केल्या प्रकरणी परभणी, मानवत व गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केलेल्या चौकशीत अनुदानात अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत मदरस्यांच्या विकासकामांसाठी २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील १३ तर व २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४ मदरशांना एकूण ४६ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा विकास निधी देण्यात आला होता. काही ठिकाणी विकास निधीमध्ये अपहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार परभणीत गटशिक्षणधिकारी संतोष राजूरकर यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत परभणी शहरातील पाकिजा मोहल्ला भागातील हजरत सय्यद शाह तुराबूल हक अरबी मदरश्याला ग्रंथालय, संगणक कक्ष व मानधनासाठी ३ लाख ६ हजार ४०० रुपये तर शहनाज मोहल्ला भागातील हजरत इब्राहीम अ.सलाम अरबी मदरसा यांना मदरसा इमारतीची डागडुजी, ग्रंथालय, शिक्षक मानधनासाठी २ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. दोन्ही मदरश्यांना आरटीजीएसद्वारे हे अनुदान वितरित करण्यात आले होते. या अनुदानाचा गैरवापर झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना दिले. त्यानुसार पोखर्णी येथील केंद्रप्रमुख व कारेगाव येथील केंद्रप्रमुख यांनी दोन्ही मदरश्यांच्या पत्यावर जावून चौकशी केली असता तेथे हे मदरसे आढळले नाहीत. या मदरश्यांचे अध्यक्ष शेख ताहेर शेख युसूफ (रा.सिद्धार्थनगर, हमालवाडी हिंगोली) व शेख रुखसाना शेख खाजा (रा.पोस्ट आॅफीस जवळ हिंगोली) हे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी संतोष राजूरकर यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शासकीय अनुदानाचा अपहार केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपी शेख ताहेर व शेख रुखसाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच मानवत येथे गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी फिर्याद दिली. त्यात जिशान ऐज्युकेश्न अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या दारुल उलूम अनसारुल उलूम या मदरशाला दिलेल्या ३ लाख ९० हजार रुपयांच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी संस्थाध्यक्ष मोहम्मद तकी अन्सारी व स.मुस्तबील स.तैय्यब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरीतही एका व्यक्तीवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते; परंतु याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
गंगाखेडमध्ये गुन्हा दाखल
गंगाखेड येथील हसनयन एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या मदरसा बाबुल इल्म अनवारे मोहम्मदी या मदरशाला ३ लाख १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. या अनुदानाचा सदरील संस्थेने दूरुपयोग केला. त्यामुळे या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांच्या फिर्यादीवरुन संस्थाध्यक्ष शेख तसबीह (रा. अकोला, ता.अंबाजोगाई जि.बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाख करण्यात आला आहे.