अखेर खळी गावात बसविले नवीन रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:22 AM2021-09-17T04:22:55+5:302021-09-17T04:22:55+5:30
खळी : खळी गावातील गावठाण भागातील रोहित्र ९ सप्टेंबर रोजी जळाल्याने नादुरुस्त झाले होते. याबाबत ‘रोहित्र जळाल्याने खळी येथे ...
खळी : खळी गावातील गावठाण भागातील रोहित्र ९ सप्टेंबर रोजी जळाल्याने नादुरुस्त झाले होते. याबाबत ‘रोहित्र जळाल्याने खळी येथे पाणीटंचाई’ या मथळ्याखाली १४ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर रोजी नवीन रोहित्र बसवून गावातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
गंगाखेड तालुक्यातील खळी गावातील आरोग्य उपकेंद्रासमोरील विद्युत रोहित्र ९ सप्टेंबरच्या सायंकाळी जळाले होते. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने सणासुदीच्या काळात सार्वजनिक पाणीपुरवठा बंद झाल्याने टंचाई निर्माण झाली होती. ‘रोहित्र जळाल्याने खळी येथे पाणीटंचाई’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १४ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत १५ सप्टेंबर रोजी नवीन विद्युत रोहित्र उपलब्ध करून देत तंत्रज्ञ अविनाश लगोटे, मुंजाजी सुरवसे यांनी बाळासाहेब पवार, विठ्ठल पिसाळ, विनायक सोन्नर, रामेश्वर पवार, बंडू सावळे, शिवाजी कणसे, दिनकर उफाडे यांच्या मदतीने नवीन रोहित्र बसविले.