अखेर वाहनांचा गराडा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:28+5:302021-02-18T04:29:28+5:30
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण परभणी : येथील सुपर मार्केट ते देशमुख हॉटेल या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची ...
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण
परभणी : येथील सुपर मार्केट ते देशमुख हॉटेल या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, नागरिकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. त्यातच रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनधारकांचा त्रास वाढला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
नागरिकांचा बिनधास्तपणा ठरू शकतो घातक
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कोणतीही काळजी सध्या घेतली जात नाही. बसस्थानक, बाजारपेठ यासह शासकीय कार्यालये, लग्नसमारंभात बिनधास्तपणे गर्दी होत आहे. नागरिक मास्क वापरण्यासही टाळत आहेत. त्यामुळे हा बिनधास्तपणा जिल्ह्यासाठी घातक ठरू शकतो. कोरोना कमी झाला असला तरी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचे नियम कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.