परभणी तहसीलमधून नक्कल प्रमाणपत्र मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:05 AM2018-11-27T00:05:14+5:302018-11-27T00:06:00+5:30
येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़
तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी केलेल्या संयुक्त कारवाईत परभणी शहरात विविध ११ ठिकाणी छापे टाकले होते़ या छाप्यानंतर बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला़ दरम्यान, या छाप्यात पथकाला तहसील कार्यालयातून नेलेले कोरे नक्कल प्रमाणपत्र सापडले़ या प्रमाणपत्रांवर तहसील कार्यालयातील शिक्केही आढळून आले़ त्यामुळे तहसील कार्यालयातील तीनही शिक्के जमा करण्यात आले असून, नवीन शिक्के तयार करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़ अद्यापपर्यंत नवीन शिक्के उपलब्ध झाले नसल्याने सध्या नकल प्रमाणपत्र दिले जात नाही़ तहसील कार्यालयात दररोज १५ ते २० नागरिक नकल प्रमाणपत्रांची मागणी करीत आहेत़ शेतीची कामे, न्यायालयीन कामांसाठी हे प्रमाणपत्र गरजेचे असते़ मात्र शिक्के नसल्याने प्रमाणपत्र मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़