८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:23 AM2021-02-27T04:23:49+5:302021-02-27T04:23:49+5:30
घरकुलासाठी वाळू द्या परभणी : जिल्ह्यात विविध ठिकाणी जप्त केेलेला वाळूसाठा पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील रखडलेल्या ...
घरकुलासाठी वाळू द्या
परभणी : जिल्ह्यात विविध ठिकाणी जप्त केेलेला वाळूसाठा पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील रखडलेल्या बांधकामांसाठी देण्यात यावा, अशी मागणी बाळासाहेब सावणे यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. निवेदनावर संजय जगताप, छाया मानमोटे, बाबूराव पंडित, भारतबाई चट्टे, शोभा बिजगिरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोरोनाबाबत जनजागृती
परभणी : तालुक्यातील यशवंत लोखंडे गायन पार्टी व लोककला विकास मंडळ संस्थेच्या वतीने परभणी तालुक्यातील पिंगळी, पिंपरी देशमुख, उखळद, मिरखेल व पूर्णा तालुक्यातील ताडकळस, कात्नेश्वर व धानोरा काळे येथे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी राजकुमार लोखंडे, चंद्रकांत दुधमल, शिवाजी गोटे, भीमराव दुधमल, समीक्षा गोटे, भैय्यासाहेब लोखंडे, आदींचा समावेश होता.
घरपोहोच आहार पुरवठ्याची चौकशी करा
परभणी : बालविकास नागरी प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत गरम, ताजा आहार व घरपोहोच आहार पुरवठ्यासाठी २८ फेब्रुवारी २०२० रोजी निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदांची चौकशी करावी, अशी मागणी मीनाक्षी गुंजकर यांनी एका निवेदनाद्वारे २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाकडे केली.