परभणीत ४० जणांकडून वसूल झाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:33 AM2021-02-28T04:33:33+5:302021-02-28T04:33:33+5:30

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी प्रभाग ...

Fines recovered from 40 people in Parbhani | परभणीत ४० जणांकडून वसूल झाला दंड

परभणीत ४० जणांकडून वसूल झाला दंड

Next

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी प्रभाग समिती क अंतर्गत विनामास्क फिरणाऱ्या २६ नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. प्रभाग समिती क चे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अब्दुल शादाब, लक्ष्मण जोगदंड, न्यायरत्न घुगे, जय मकरंद, कुणाल भारसाकळे, नागेश उबाळे, प्रमोद उबाळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली. प्रभाग समिती अ अंतर्गत मुख्य बाजारपेठ तसेच नानलपेठ भागात विनामास्क फिरणाऱ्या ४० जणांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड लावण्यात आला. सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, मेहराज अहेमद, विकास रत्नपारखे, राजू झोडपे आदीच्या पथकाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते स्टेशन रोड या भागात विनामास्क फिरणाऱ्या २३ नागरिकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त देविदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली विनय ठाकूर, श्रीकांत कुरा, मेराज, शेख इस्माईल आदींच्या पथकाने केली.

Web Title: Fines recovered from 40 people in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.