परभणी शहरात वडापावच्या गाडीला आग, दोन सिलेंडरचा स्फोट; शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना
By राजन मगरुळकर | Updated: January 12, 2025 12:21 IST2025-01-12T12:19:33+5:302025-01-12T12:21:30+5:30
तुलसी हॉटेल समोर वसमत रोड येथे मातोश्री वडापाव गाड्याला आग लागल्याची माहिती रवि बाळासाहेब मोरे यांनी दिली त्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणुन पूर्णपणे थांबविली. यात दोन गॅस सिलेंडर व इतर साहित्य आगीत जळाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

परभणी शहरात वडापावच्या गाडीला आग, दोन सिलेंडरचा स्फोट; शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना
राजन मंगरूळकर -
परभणी : शहरातील वरदळीच्या वसमत महामार्ग रस्त्यावर शिवशक्ती बिल्डिंग परिसरात एका वडापावच्या गाडीला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री पावणे बारा ते १२ यादरम्यान घडली. त्यामध्ये दोन सिलेंडरच्या स्फोट होऊन मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर त्वरित परभणी महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवते आणि कर्मचारी सुद्धा आले होते. तुलसी हॉटेल समोर वसमत रोड येथे मातोश्री वडापाव गाड्याला आग लागल्याची माहिती रवि बाळासाहेब मोरे यांनी दिली त्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणुन पूर्णपणे थांबविली. यात दोन गॅस सिलेंडर व इतर साहित्य आगीत जळाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
प्र. अग्निशमन केंद्र अधिकारी डी. यू. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जवान उमेश कदम, अक्षय पांढरे, वाहन चालक वसीम अखिल अहेमद हे दाखल झाले होते. रविवारी सकाळी अनेक नागरिकांना या घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळी जाऊ काय नुकसान झाले, स्फोट कसा झाला याची माहिती घेतली. दोन्ही सिलेंडर जोरात फुटल्याने या वसमत महामार्गावर मध्यरात्री मोठा आवाज आणि आगीचे लोट पसरले होते.