नूतन जिनिंगमध्ये आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:06+5:302020-12-29T04:15:06+5:30

सेलू : येथील पाथरी रस्त्यावरील नूतन काॅटन जिनिंग प्रेसिंगमध्ये अचानक आग लागून लाखो रूपये किमतीच्या मशीनचे नुकसान ...

Fire in new ginning; Loss of millions | नूतन जिनिंगमध्ये आग; लाखोंचे नुकसान

नूतन जिनिंगमध्ये आग; लाखोंचे नुकसान

Next

सेलू : येथील पाथरी रस्त्यावरील नूतन काॅटन जिनिंग प्रेसिंगमध्ये अचानक आग लागून लाखो रूपये किमतीच्या मशीनचे नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरातील ८ जिनिंगसह नूतन काॅटन जिनिंगमध्ये सीसीआयकडून मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापूस जिनिंग आणि प्रेसिंग दिवसरात्रं सुरू आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता जिनिंगची दुसरी पाळी संपल्यानंतर रविवार असल्याने खराब झालेल्या रूईची प्रेसिंग सुरू होती. अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळात वीज येताच शाॅर्टसर्किट होऊन मशीनमधील रोल, बेल्ड, इलेक्ट्रिकल वायरिंग सेन्नसर आणि बाॅक्स आगीत जळून खाक झाले. जिनिंगमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान राखून जिनिंगमधील आग रोधक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वेळीच जिनिंगमधील मुख्य वीजपुरवठा करणारी यंत्रणा बंद केली. सेलू आणि पाथरीनगर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. या आगीत जिनिंग आणि प्रेसिंग करणाऱ्या महागड्या मशीन जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, फटाके फोडल्याप्रमाणे मशीनमधील साहित्य जळून खाक झाले.

मोठा अनर्थ टळला ; विजेची मोठी समस्या

नूतन काॅटन जिनिंगमध्ये रविवारी अचानक आग लागून मशीनचे मोठे नुकसान झाले. दुर्दैवाने रविवार असल्याने आणि साफसफाई सुरू असल्याने शेडमध्ये कामगारांची संख्या कमी होती. तसेच वेळीच जिनिंगमधील आग रोधक यंत्रणेचा वापर केल्याने आग शेडच्या बाहेर पसरली नाही. जिनिंगमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी करून प्रेसिंग झालेल्या शेकडो गाठी आहेत. दरम्यान, औद्योगिकचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून कधी कमी दाबाने तर अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा होत असल्याने दुर्घटना घडत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Fire in new ginning; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.