आधी तुझं माझं जमेना, अन आता तुझ्यावाचून करमेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:20+5:302021-09-25T04:17:20+5:30
पती व पत्नीच्या किरकोळ वादाच्या घटनांतून व कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या कुरबुरीत अनेकांचे संसार तुटतात. असेच काही प्रकार जिल्ह्यात घडले ...
पती व पत्नीच्या किरकोळ वादाच्या घटनांतून व कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या कुरबुरीत अनेकांचे संसार तुटतात. असेच काही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. जानेवारी २०२० ते जून २०२१ या काळात दीड वर्षाच्या काळात तब्बल १ हजार ७० महिलांच्या छळाचे प्रकार घडले. यातील ४८१ प्रकरणे भरोसा सेलने निकाली काढली.
१ हजार ७० प्रकरणे दीड वर्षात भरोसा सेलकडे आली
४८१ प्रकरणात दीड वर्षात घडवून आणला समेट
बायको वारंवार माहेरी जाते म्हणून वाद
यातील अनेक प्रकरणांमध्ये वादाची कारणे किरकोळ स्वरूपाची आहेत. यात बायको वारंवार माहेरी जाते तसेच सतत खरेदी करते. यात अवास्तव पैसा खर्च होतो. काही प्रकरणात आई-वडिलांशी नीट वागत नाही, अशी प्रकरणे अनेकांच्या बाबतीत घडली आहेत.
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये आहे भरोसा सेल
जिल्ह्यात १९ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. यामध्ये महिलांच्या छळाच्या तक्रारी तसेच अन्य गुन्हे महिलांना नोंदविता यावेत, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल काम पाहतो. याच विभागाचे काम प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एका कर्मचाऱ्याकडे दिलेले असते.
हुंडा व अन्य कारणानेही होतो छळ
कोरोना काळात व त्या आधीपासूनही पती-पत्नीचा वाद याचे प्रमुख कारण लग्नातील हुंडा हे मोठ्या प्रमाणावर असते. लग्नानंतर याच प्रकारातून वाद होतात. यानंतर पती-पत्नी वेगळे होण्यासाठी किंवा छळ झाला म्हणून तक्रार अर्ज देतात. यावर भरोसा सेलकडून दोघांचे म्हणणे ऐकून यातील अनेकांचे संसार पुन्हा जुळविण्यासाठी प्रयत्न केले जातात.