मत्स्य सदृश्य बाळ ठरले अल्पायुषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:30 AM2018-08-20T06:30:55+5:302018-08-20T06:31:27+5:30
बाळाच्या जुळलेल्या पायांचा आकार माशाच्या शेपटासारखा होता
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयात शनिवारी दुपारी दुर्मिळ अशा मत्स्य सदृश्य बाळाला मातेने जन्म दिला़ या बाळाचे दोन्ही पाय जुळलेले होते आणि पायांचा आकार माशाच्या शेपटासारखा दिसत होता़ वैद्यकीय उपचाराला हे बाळ प्रतिसाद देत नव्हते. तीन तासानंतर उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला़
येथील स्त्री रुग्णालयामध्ये शनिवारी एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली़ यापूर्वी स्त्री रुग्णालयात या महिलेने उपचार घेतले नव्हते़ परंतु, अत्यावस्थ अवस्थेत ही महिला दाखल झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेचे सिझर करण्याचा निर्णय घेतला़ १८ आॅगस्ट रोजी दुपारी साधारणत: २ वाजेच्या सुमारास डॉ़राणा नाजनीन यांच्यासह वैद्यकीय अधिकाºयांनी महिलेची प्रसुती केली़ तेव्हा या बाळाला एकच पाय असल्याचे निदर्शनास आले़ तसेच अन्य काही बाबीही सर्वसामान्य बाळाप्रमाणे नसल्याचे लक्षात आले़ त्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन या बाळास जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी बाळाला काचेच्या पेटीत ठेवून त्याच्यावर उपचारही सुरू केले़ परंतु, हे बाळ उपचाराला प्रतिसाद देत नव्हते़ त्यामुळे दोन-तीन तासांचेच आयुष्य जगल्यानंतर बाळ दगावले.
जनुकीय संरचनेत बदलाचा परिणाम
असे बाळ जन्माला येण्याचा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे़ या बाळाचे दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले होते़ तसेच शौचास व लघवीची जागाही नव्हती़ बाळाचे वजन २़५ किलो असे सर्वसाधारणे बाळाप्रमाणेच असले तरी बाळाच्या श्वास घेण्याची गतीही संथ होती़ त्यामुळे आम्ही बाळावर सर्वतोपरी उपचार सुरू केले़ परंतु, या उपचारांना बाळ प्रतिसाद देत नव्हते़ जनुकीय संरचनेत बदल झाल्याने अशा प्रकारे बाळ जन्माला येऊ शकते़, असे नवजात शिशु विभागातील डॉ़ श्रीपाद गायकवाड यांनी सांगितले़