रबीतील पीकविमा योजनेत पाच पिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:19 AM2017-11-21T00:19:22+5:302017-11-21T00:19:31+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भूईमूग या पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे़ १७ नोव्हेंबरपासून ही योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भूईमूग या पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे़ १७ नोव्हेंबरपासून ही योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे़
जिल्ह्यात यावर्षीच्या रबी हंगामात २० नोव्हेंबरपर्यंत दीड लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ पेरणी झालेल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेची अंमलबजावणी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या मार्फत केली जाणार आहे़ रबी हंगामातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, कीड व रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात घट आल्यास तसेच प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे, काढणीच्या वेळेस, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाला नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे़
परभणी जिल्ह्यातील आधीसूचित महसूल मंडळातील शेतकºयांनी गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भुईमूग या पिकांचा विमा हप्ता १ जानेवारी २०१८ पर्यंत भरून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक संरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे़