जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:31 PM2017-12-07T23:31:05+5:302017-12-07T23:31:10+5:30
जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५ कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वितरित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५ कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वितरित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी जि.प.ने जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने ५५ रस्त्यांच्या कामांची यादी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यानुसार या यादीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत तब्बल ५ कोटी ३४ कोटी ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वर्ग करण्यात आला आहे. या निधीमधून ब्राह्मणवाडी ते नांदगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी ११ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून राज्यमार्ग २४८ ते झरी-मिर्झापूर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठीही ११ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संबर - आनंदवाडी, आंबेटाकळी- दामपुरी, ताडकळस ते माखणी, राज्य मार्ग २२१ पासून विटा-लासीना- थडी उक्कडगाव- लोहीग्राम- शिर्शी जिल्हा मार्ग सीमा, प्र.जि.मा. १८ ते मानकादेवी तालुका सरहद्द, आनंदवाडी ते वाघदरी या सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी प्रत्येकी ११ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्र.जि.मा.३१ ते वडगाव इक्कर, परभणी शहर ते वांगी रस्ता, हिवरा बु. धोत्रा ते जिल्हा सीमा, जोडरस्ता बाणेगाव ते ताडकळस, राज्यमार्ग ६१ ते नाथरा वस्ती, रेणापूर ते इटाळी, जोडरस्ता मसला तांडा, इजिमा १, राणीसावरगाव ते राणीसावरगाव पाटी- पाळोदी, राज्य मार्ग २२१ पासून उखळी बु. ते भूक्तारवाडी, प्रजिमा ३ ते क्वॉटन सेंटर ते चारठाणा, प्ररामा २ ते मालेगाव, अंगलगाव ते मुरुमखेडा, जोडरस्ता म्हाळसापूर, मोरेगाव-ब्राह्मणगाव-सोनवटी, जोडरस्ता डिग्रसवाडी ता. सेलू, राज्यमार्ग २४८ ते धारासूर प्रजिमा २१, खादगाव पाटी ते खादगाव रस्ता, जोडरस्ता पिंपरी ते इरळद, राज्यमार्ग २३४ ते अकोली - इसाद, पिंपळगाव ते तांबुळगाव (ता.पालम), जोडरस्ता सावंगी भूजबळ प्रजिमा ३५, राज्यमार्ग २३५ ते जोडरस्ता मोजमाबाद तांडा, इजिमा १७ ते जोडरस्ता कांदलगाव या सर्व रस्त्यांसाठी प्रत्येकी ६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. टाकळगव्हाण- झाडगाव, राज्यमार्ग ६१ ते वडगाव सुक्रे ते सूरपिंपरी राज्यमार्ग २४८ ते तरोडा, जांब- सोन्ना, जोड रस्ता सुरवाडी, टाकळगव्हाण ते सारोळा, मानवत- उक्कलगाव- इटाळी ते तालुका सीमा, राणीसावरगाव ते गुंजेगाव या सर्व रस्त्यांसाठी ४ लाख ९० हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यमार्ग २४९ ते सातेगाव, प्ररामा १६ ते निळा या रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्यमार्ग ६१ ते वरखेडा या रस्त्यासाठी १३ लाख ५० हजार तर जोडरस्ता आटुळा, प्रजिमा २ ते बेलोरा या रस्त्यांसाठी १३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बोरी- करवली सिमेंट रस्त्यासाठी ३८ लाख ७५ हजार रुपये तर गोगलगाव ते पाटी आंबेगाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २४ लाख आणि सेलू ते निपाणी टाकळी रस्त्याच्या कामासाठी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय प्रजिमा ८ पासून जोडरस्ता चिंचोली दराडे यासाठी २० लाख ७५ हजार, जोडरस्ता वाघी बोबडेसाठी ९ लाख ८० हजार, बोरी-करवली रस्त्यासाठी ८ लाख, जोगवाडा- जिंतूर- घेवंडा रस्त्यासाठी ८ लाख ७५ हजार आणि सावरगाव ते प्रजिमा ३५ ता. मानवत या रस्त्यासाठी १४ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.