पूर्णा नदीला पूर, पूर्णा-परभणी मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 05:45 PM2021-09-29T17:45:04+5:302021-09-29T17:46:10+5:30
पूर्णा शहराकडून परभणीकडे जाणाऱ्या झिरोफाटा मार्गावर दुसऱ्या दिवशी ही थुना नदीला पूर असल्याने माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे.
पूर्णा (परभणी ) : येलदरी, सिद्धेश्वर धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे. आज दुपारी नदीचे पात्र दहा मीटर उंच पातळीने वाहत होते.
तालुक्यात मंगळवारी रात्रीनंतर पावसाने विश्रांती घेतली. संध्याकाळपर्यंत तालुक्यातील सर्वच लहान मोठ्या नद्यांना पूर आला होता. पूर्णा नदीला ही पुरस्तिथी होती. बुधवारी पाऊस थांबला असला तरी धरणातील सव्वालाख पाण्याच्या विसर्गामुळे मुळे पूर्णा नदी उफाळून वाहत आहे. कंठेश्वर येथे गोदावरी नदीला ही पूर असल्याने पूर्णा नदीचे पाणी यात जात नाही. परिणामी पूर्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. दुसरीकडे पूर्णा नदी लगत असलेले थुना नदीला ही पूर स्तिथी आहे. पूर्णेच्या पात्रात थुना नदीचा विसर्ग होत नसल्याने नदी तुडूंब भरली आहे. तालुक्यात वाहणाऱ्या तिन्ही नद्यांना पूर आल्याने हजारो हेक्टर शेती पिके पाण्याखाली गेले आहेत.
पूर्णा-झिरोफाटा मार्ग सलग दुसऱ्या बंद
पूर्णा शहराकडून परभणीकडे जाणाऱ्या झिरोफाटा मार्गावर दुसऱ्या दिवशी ही थुना नदीला पूर असल्याने माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे. हा मार्ग ही दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहिला होता.