लेंडी, गळाटी नद्यांना पूर; पालम तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 01:48 PM2021-09-23T13:48:51+5:302021-09-23T13:51:59+5:30
Rain in Parabhani : पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड गावचा संपर्क देखील तुटलेला आहे.
पालम ( परभणी ) : तालुक्यातील गळाटी व लेंडी नदीच्या पुरामुळे २३ सप्टेंबर रोजी तब्बल १४ गावांचा संपर्क पालमशी तुटला आहे. तर पावसामुळे गुळखंड येथील कोरोना लसीकरण रद्द करण्यात आले आहे. ( flooding to Lendi and Galati rivers;14 villages in Palam taluka lost contact)
मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने पालम तालुक्यातील बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे. लेंडी नदीच्या पुरामुळे 22 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नऊ गावांचा संपर्क तुटला होता. तो 24 सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा एकदा नदीला पूर आल्याने ही गावे संपर्क बाहेर आहेत. प्रामुख्याने पुयनी येथील पुलावरून लेंडी नदीचे पाणी वाहू लागल्याने सकाळी १० वाजल्यापासून पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी, तेलजापुर आणि गणेशवाडीचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. दूसरीकडे याच नदीवरील पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड गावचा संपर्क देखील तुटलेला आहे. तर गळाटी नदीवरील सायळा ते सिरपूर दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामूळे ११.४५ वाजल्यापासून सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडीचा संपर्क पालमशी होऊ शकत नाही.
दूध घेऊन येणारा ऑटोरिक्षा फसला
पालम तालुक्यातील खुर्लेवाडी येथून दूध घेऊन केरवडीला येणारा ऑटोरिक्षा सिरपूर ते सायाळा दरम्यानच्या रोडवर सकाळी ७ वाजता फासला होता. अखेर वाहनातील दुधाच्या कॅन बाहेर काढून चौघांना ऑटोरिक्षा ढकलून चिखलाबाहेर काढावा लागला. पाऊस आल्यानंतर हा प्रश्न हमखास उद्भवतो, अशी माहिती ऑटोचालक भगवान गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह
हेही वाचा - शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली