फुलांची आवक वाढली, हार मात्र महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:19 AM2021-09-11T04:19:24+5:302021-09-11T04:19:24+5:30
शहरात नांदेड, परतूर, जालना, बिलोली, हैदराबाद यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लागवड केलेली फूले बाजारात विक्रीसाठी येतात. यात पिवळा झेंडू ...
शहरात नांदेड, परतूर, जालना, बिलोली, हैदराबाद यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लागवड केलेली फूले बाजारात विक्रीसाठी येतात. यात पिवळा झेंडू तसेच शेवंती यांच्या हाराचे दर १५० रुपये एवढे झाले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गुलाबाचे एक फूल ५ रुपये दराने विक्री होत होते. यासह मोगऱ्याची फुले, गजरा याचेही दर वाढले होते. एरवी १० रुपयांना मिळणारा गजरा २० रुपये दराने विक्री होत होता.
साधे हार १० ते २० रुपये ऐवजी ३० रुपयाला मिळत होते. तसेच बाजारात हारांच्या मागणीमुळे दररोज होणारी खुल्या फुलांची आवक विक्रेत्यांनी कमी केली होती. यामुळे अनेकांना पूजेसाठी लागणारी फुले उपलब्ध झाली नाहीत. यामुळे फुल विक्रेत्यांनी, हार विक्रेत्यांनी हार विक्रीला जास्त प्राधान्य दिले.
महापूजेच्या हारांचे भाव गुलदस्त्यात
काही हार विक्रेत्यांनी महालक्ष्मी सणासाठी महापूजेला लागणाऱ्या हारांची नोंदणी आधीच करून घेतली. परंतू, सोमवारी असलेल्या हाराच्या व फुलाच्या दराप्रमाणे हार दिले जातील अशी माहिती विक्रेत्यांनी सांगितली. यामुळे सणावाराच्या काळामध्ये हार तसेच फुलांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
छोटे हार - ३० रुपये
गजरा - २० रुपये
एक गुलाबाचे फुल - ५ रुपये