अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:02 AM2021-02-05T06:02:29+5:302021-02-05T06:02:29+5:30

मानवत : रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे प्रतिपादन न्यायाधीश बी. डी. गोरे यांनी केले. ...

Follow traffic rules to avoid accidents | अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा

अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा

Next

मानवत : रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे प्रतिपादन न्यायाधीश बी. डी. गोरे यांनी केले. दिनांक २३ जानेवारी रोजी तालुका विधी समिती व वकील संघाच्यावतीने वाहतूक सुरक्षा नियम व चिन्ह जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाल, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, महामार्ग पथक प्रमुख प्रकाश कुकडे, वकील संघाचे ॲड. सुनील जाधव, ॲड. अनिरुद्ध पांडे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक लोकलवार, ॲड. अनिरुद्ध काळे, ॲड. यशपाल पंडित, ॲड. अरुण गोलाईत उपस्थित होते. न्या. गोरे म्हणाले की, वाहनचालक वाहतूक शाखेने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करताना दिसून येत नाहीत. परिणामी, अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातात जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालवताना सर्वांनीच वाहतूक शाखेने घालून दिलेल्या नियमांचे तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी असणाऱ्या दिशादर्शकांचा योग्य वापर करावा, असे सांगितले. यावेळी महामार्ग शाखेचे पथक प्रमुख प्रकाश कुकडे यांनी वाहतूक नियमांची माहिती सांगितली. सूत्रसंचालन ॲड. मुकुंद पाटील यांनी केले.

Web Title: Follow traffic rules to avoid accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.