परभणी: निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:01 AM2019-05-11T00:01:03+5:302019-05-11T00:03:08+5:30
निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यावरुन जोरदार वादावादी सुरु झाली असून पाणी सोडण्यास जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विरोध दर्शवित धरणाच्या पायथ्याशी पाण्यात बसून आंदोलन केले. तर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी पाणी सोडण्यास विरोध नाही; परंतु, टँकरने पाणीपुरवठा करा, अशी भूमिका मांडली. दुसरीकडे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परभणीला १५ दलघमी पाणी देणारच, अशी भूमिका घेतल्याने दुधनाचा पाणीप्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी/सेलू : निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यावरुन जोरदार वादावादी सुरु झाली असून पाणी सोडण्यास जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विरोध दर्शवित धरणाच्या पायथ्याशी पाण्यात बसून आंदोलन केले. तर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी पाणी सोडण्यास विरोध नाही; परंतु, टँकरने पाणीपुरवठा करा, अशी भूमिका मांडली. दुसरीकडे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परभणीला १५ दलघमी पाणी देणारच, अशी भूमिका घेतल्याने दुधनाचा पाणीप्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. परभणी, सेलू, मानवत, जिंतूर व पूर्णा तालुक्यातील काही गावांमधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह अन्य काही नेते मंडळींनी केली आहे. त्याला परतूरचे माजी आ.सुरेश जेथलिया यांच्यासह तेथील स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुधना प्रकल्पाच्या पायथ्याशी मंठा, परतूर तालुक्यातील पूनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने दुधनातून पाणी सोडण्यास विरोध दर्शवित पाण्यात बसून आंदोलन केले. या आंदोलनात सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे हेही सहभागी झाले. सकाळी ११ वाजता सुरु झालेले हे आंदोलन दुपारी ३ वाजता संपले. आंदोलकांची पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, काहींचा पाण्यावरुन राजकारण करण्याचा हेतू आहे. धरण उभारणीपासून मी साक्षीदार आहे. धरणातून परभणीसाठी पाणी सोडण्याच्या वृत्तपत्रातील बातम्या खोट्या असून यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. जलसंपदा विभागाचा अहवाल येईपर्यंत तो निर्णय होणार नाही. धरणाच्या बॅक वॉटरमध्ये शेतकऱ्यांनी पिकासाठी टाकलेल्या मोटारी मी काढू देणार नाही. त्या शेतकºयांनी आपल्या जमिनी, घरे धरणासाठी दिली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी घाबरु नये. दोन्ही जिल्ह्यांना पुरेल, एवढे पाणी धरणात आहे. नदीत पाणी सोडल्यास त्याचा अपव्यय होईल. त्यामुळे पिण्याचे पाणी टँकरद्वारे देण्यास आपला विरोध राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बारगुजे, सेलूचे पारधी, पाटबंधारेचे अभियंता जाधव आदींची उपस्थिती होती.
परभणीला १५ टीएमसी पाणी देणारच- दिवाकर रावते
४निम्न दुधना प्रकल्पातून परभणीला १५ दलघमी पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या मागणीच्या अनुषंगाने शुक्रवारी आ.डॉ.राहुल पाटील यांनी मुंबईत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची शुक्रवारी भेट घेतली व त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. यावेळी रावते यांनी परभणीकरांना १५ टीएमसी पाणी मिळणारच असे सांगितले. भयावह दुष्काळी स्थितीत परभणीची जनता भरडली जात आहे. त्यामुळे दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अधिकाºयांसोबत विशेष बैठक घेतली आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे ही त्यावेळी उपस्थित होते.
४त्या बैठकीत आपण परभणीच्या पाण्यासाठी आग्रह धरला. लोणीकर यांचाही पाणी सोडण्यास विरोध होता, त्यांचीही समजूत काढली. मुख्यमंत्र्यांनीही विशेष बाब म्हणून परभणीच्या पाण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे.त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाईल, असे ते म्हणाले. परतूरचे माजी आ. सुरेश जेथलिया यांनी जनतेच्या भावना समजून घ्यायला हाव्यात, शेतकºयांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, असेही यावेळी रावते म्हणाले. या संदर्भात औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनाही सूचना दिली असल्याचे रावते म्हणाले.
पाण्यासाठी शेतकरी करणार रास्तारोको
४निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परभणी तालुक्यातील शेतकरी १६ मे रोजी दुधना नदीच्या पुलावर रास्तारोको आंदोलन करणार आहेत. तसा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
४दुधना नदीपात्रात पाण्याचा एक थेंबही नाही. त्यामुळे नदीकाठचे गाव, तांडा, वस्त्यांमध्ये पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे १५ मे पर्यंत नदीपात्रात पाणी सोडावे, अन्यथा १६ मे रोजी सकाळी ९ वाजता दुधना नदीच्या पुलावर झरी, खानापूर, मांडवा, जलालपूर, पिंपळा, टाकळी कुंभकर्ण, हिंगला, सनपुरी, मांगणगाव आदी भागातील शेतकरी रास्तारोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर रामकिशन मुळे, कुंडलिक पांढरे, नारायण गडदे, सोपान आरमळ, गणेश मोरे, दामोधर घुगे, संदीप जाधव, कैलास रगडे, अभिजीत परिहार, भास्कर जगाडे, ओंकार सावंत आदी अनेक शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.