निम्न दुधनाचे पाणी परभणीकडे झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:38 AM2018-02-07T00:38:23+5:302018-02-07T00:38:29+5:30
निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून ६ फेब्रुवारी रोजी ११८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात आला आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून ६ फेब्रुवारी रोजी ११८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात आला आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आले आहे़
परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो़ या बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता़ या निर्णयानुसार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास प्रकल्पाचे तीन दरवाजे १० सेमीने तर एक दरवाजा ७ सेमीने वर उचलून ११८१ क्युसेस पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. ४८ तासांमध्ये हे पाणी राहटी बंधाºयात पोहोचणार आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यापूर्वी येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जात होते़ यावर्षी येलदरी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ त्यानुसार मंगळवारी १ दलघमी पाणी परभणी शहरासाठी घेण्यात आले़ यापूर्वी २२ डिसेंबर रोजीही निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते़ मात्र हा पाणीसाठा संपल्याने मंगळवारी पुन्हा एकदा प्रकल्पातून पाणी घेण्यात आले आहे़
यावर्षी निम्न दुधना प्रकल्पामध्ये परभणी शहराबरोबरच पूर्णा शहरासाठीही पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ दोन्ही शहरांसाठी प्रकल्पातील ३० दलघमी पाणी आरक्षित केले असून, यापूर्वी प्रकल्पामधून एक संयुक्त पाणी पाळी घेण्यात आली होती़ मंगळवारी परभणी शहरासाठी स्वतंत्र पाणी पाळी घेण्यात आली आहे़ १ दलघमी पाण्यासाठी प्रकल्पातून ७ दलघमी पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे़ ही बाब लक्षात घेता येलदरी प्रकल्पातील पाण्याच्या आरक्षित साठ्यामध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे़
५८ टक्के पाणी शिल्लक
निम्न दुधना प्रकल्पात सध्या २४४़८० दलघमी एकूण पाणीसाठा उपलब्ध असून त्यात १४२ दलघमी (५८ टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे़ दुधना प्रकल्पातून सध्या सेलू शहर, आडगाव पाणीपुरवठा योजना आणि परतूर शहराला पाणीपुरवठा केला जातो़ आता त्यात परभणी व पूर्णा शहराची भर पडली आहे़