शासकीय मुलांच्या निवासी शाळेत ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:23 PM2020-01-10T19:23:19+5:302020-01-10T19:25:21+5:30

१० विद्यार्थ्यांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

food poisoning in a residential school of government at Purna | शासकीय मुलांच्या निवासी शाळेत ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

शासकीय मुलांच्या निवासी शाळेत ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

googlenewsNext

पूर्णा : मागासवर्गीय मुलांच्या निवासी शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि ९ ) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. २५ सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून १० विद्यार्थ्यांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्णा पांगरा रस्त्यावर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह आहे. या  विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे जेवण केले मात्र यानंतर काही विद्यार्थ्यांना  मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला.  हा प्रकार व्यवस्थापणास लक्षात येताच त्यांनी ३६ विद्यार्थ्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यापैकी १० विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात होती तर उर्वरित २६ विद्यार्थ्यांना लगेचच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले.

या वेळी पूर्णा पोलोस ठाण्याचे पो नि सुभाष राठोड, महिला अधिकारी चतुराबाई गावनडे यांनी भेट दिली होती. मागासवर्गीय मुलांच्या निवासी शाळेत एकूण १६० विद्यार्थी आहेत या पैकी १४५ विद्यार्थी हजर होते. याविषयी वसतिगृहाचे अधीक्षक कोलपेकवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी दुपारी समाज कल्याणचे सहआयुक्त व त्यांच्या पथकाने वसतिगृहाची पाहणी केली.
 

Web Title: food poisoning in a residential school of government at Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.