गावपातळीवरील सत्तेसाठी राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:13 AM2020-12-27T04:13:11+5:302020-12-27T04:13:11+5:30

निवडणुकीचा पाया हा ग्रामपंचायतीपासून सुरू होतो. त्यामुळे ग्रामपातळीवरील सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये ...

Formation of political leaders for village level power | गावपातळीवरील सत्तेसाठी राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी

गावपातळीवरील सत्तेसाठी राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी

Next

निवडणुकीचा पाया हा ग्रामपंचायतीपासून सुरू होतो. त्यामुळे ग्रामपातळीवरील सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये सध्या फारशी हालचाल होताना दिसत नाही. नव्हे. तर सक्षम नेतृत्वाचा अभाव क्रियाशील पक्ष कार्यकर्ते नसणे तसेच पक्षाला आलेली मरगळ यामुळे जिंतूर तालुक्यात काँग्रेस पक्ष फारसा चर्चेत नाही.

मोठ्या ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेच

मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोटीच्या घरात आहेत. विधानसभेच्या दृष्टीने बोरी चारठाणा व आडगाव बाजार ही सत्तेची महत्त्वाची केंद्रे आहेत. या गावच्या पक्षाची सत्ता तो पक्ष विधानसभेच्या दृष्टीने ताकदवर असे समजले जाते. त्यामुळेच या ग्रामपंचायतींवर सत्तेसाठी राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करीत असताना दिसत आहेत.

थेट सरपंचाची संधी उठली

भाजपा सत्तेच्या काळात थेट सरपंचाची निवडणूक घेण्याचा कायदा संमत झाला. परंतु, आघाडी सरकारने सरपंचपदाची निवडणूक रद्द केल्याने आता निवडलेल्या संदेशातील सरपंच होणार आहे. त्यामुळे घोडेबाजाराला मोठी संधी असून तरुणाईत थेट सरपंच होण्याची संधी असल्याने नाराजीचा सूर आहे.

Web Title: Formation of political leaders for village level power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.