परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:13 AM2018-09-15T00:13:48+5:302018-09-15T00:14:51+5:30
हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत.
आर्वी येथील शेतकरी उत्तम कदम यांनी ३ क्विंटल ६० किलो मूग विक्रीसाठी शुक्रवारी बाजार समितीत आणला; परंतु, तेथे मालाची एफएक्यू तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी बाजार समितीचे सचिव विलास मस्के यांची भेट घेऊन शेतमाल खरेदी करावा, असे साकडे घातले. मात्र मस्के यांनी वजनकाटा बंद असल्यामुळे हा माल बाजार समिती घेण्यात येणार नाही, असे सांगितले.त्यानंतर शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत हा माल घ्यावा, अशी विनंती केली; परंतु, आमच्याकडे माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आपला माल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवून या, असे सांगितले. त्यानंतर शेतकरी व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांनी हा माल जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आणून टाकला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून हा शेतमाल खरेदी करावा, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी बाजार समितीच्या सचिवांना बोलावून घेत काटा का सुरु केला नाही? त्रिसदस्यीय समितीची स्थापना का केली नाही, असे प्रश्न करुन धारेवर धरले. त्यानंतर शेतकºयांचा माल शेतमाल तारण योजनेंतर्गत तात्काळ ठेवून घ्या, असे आदेश दिले. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोपर्यंत जिल्हा उपनिबंधक बाजार समितीमधील व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केलेल्या शेतमालाची पाहणी करणार नाहीत, तोपर्यत हा माल उचलला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुरु असलेली सहाय्यक उपनिबंधकांची बैठक अटोपून उपस्थित सर्व सहाय्यक उपनिबंधकांना घेऊन बाजार समितीच्या मार्केट यार्डात ते दाखल झाले. त्यानंतर बाजार समितीतील श्रीनिवास ट्रेडिंग कंपनी, राठी आडत दुकान, भारत ट्रेडिंग कंपनी व महेश ट्रेडिंग कंपनीची तपासणी केली. या तपासणीमध्ये व्यापाºयांनी शेतकºयांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केली. शेतमाल खरेदीची कोणतीही नोंद बाजार समितीकडे उपलब्ध नसल्याचे सुरवसे यांच्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर सुरवसे यांनी मार्केट यार्डात सर्व व्यापाºयांची बैठक बोलविली.
या बैठकीत शेतकºयांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने व्यापाºयांनी खरेदी करु नये, बाजार समितीला कारभार पाहणे शक्य होत नसेल तर बाजार समिती बरखास्त करावी व ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला आहे, त्यामध्ये राठी आडत दुकान, श्रीनिवास ट्रेडिंग कंपनी, भारत ट्रेडिंग कंपनी, महेश ट्रेडिंग कंपनी या चार दुकानांचा परवाना निलंबित करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या आहेत.
परभणी बाजार समितीचा अनागोंदी कारभार
परभणी बाजार समितीची ई-नाम योजनेंतर्गत निवड झाली आहे. त्यामुळे बाजार समिती परिसरातील फडकरी व किरकोळ विक्रेत्यांना शेतमाल खरेदी- विक्रीसाठी बंदी घालण्यात आली होती. तसे राज्य शासनाचे आदेशही आहेत; परंतु, जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या पाहणीतून फडकरी व किरकोळ विक्रेते शेतकºयांचा माल खरेदी करताना दिसून आले. तसेच ज्या व्यापाºयांना शेत माल खरेदीचे परवाने आहेत, त्या व्यापाºयांकडून क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. व्यापाºयांनी खरेदी केलेल्या मालाच्या नोंदी बाजार समितीकडे आढळून आल्या नाहीत. त्याच बरोबर मागील काही महिन्यांपासून बाजार समितीतील वजनकाटा बंद आहे. हा सर्व प्रकार सर्रास सुरु असताना कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र मूग मिळून गप्प असल्याचे दिसून आले.
कोºया संमती पत्रावर शेतकºयांच्या स्वाक्षºया
बाजार समितीतील त्रि सदस्यीय समितीकडून एफएक्यू व नॉन एफएक्यू शेतमाल तपासणीसाठी कोणतेही पाऊले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे व्यापाºयांनी शेतकºयांकडूनच संमतीपत्र भरुन घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी केलेल्या पाहणीमध्ये राठी आडत दुकानामध्ये तर कोºया संमतीपत्रावर शेतकºयांच्या स्वाक्षºया आढळून आल्या.