परभणीतून चौघांना एटीएसने घेतले ताब्यात, गुरूवारी पहाटे झाली कारवाई
By राजन मगरुळकर | Published: September 22, 2022 02:00 PM2022-09-22T14:00:01+5:302022-09-22T14:05:33+5:30
नांदेड, औरंगाबाद येथील पथकाने परभणीत केली कारवाई.
परभणी : दहशतवाद विरोधी पथकाच्या नांदेड, औरंगाबाद येथील पथकाने परभणीत गुरुवारी पहाटे कारवाई करीत चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईला पोलीस तसेच एटीएस सूत्रांनी दुजोरा दिला.
परभणी शहरात २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान ही कारवाई झाली. बुधवारी मध्यरात्री नांदेड, औरंगाबाद व परभणी एटीएसचे पथक शहरात या कारवाईसाठी आले होते. त्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया शाखा परभणीच्या चार जणांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईत चार जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्यावर ठाणे येथील काळा चौकी पोलीस ठाणे येथे कलम १२१(अ), १५३(अ), १२०(ब), १०९ भादवि, सहकलम १३(१) (ब) युएपीए गुन्ह्यात कारवाई करण्यात आल्याचे समजते. ही कारवाई नांदेड एटीएसचे सपोनि. डि.एस.शिंदे, औरंगाबाद एटीएसचे सपोनि. देशमुख यांच्यासह औरंगाबाद पथकातील अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे.