परभणीत उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:40 AM2018-04-07T00:40:28+5:302018-04-07T00:40:28+5:30

Four posts of Parbhani sub-district officials are vacant | परभणीत उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त

परभणीत उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाºयांची चार पदे रिक्त असल्याने त्याचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन, पुनर्वसन, सामान्य प्रशासन, रोजगार हमी योजना, पुरवठा, निवडणूक व निवासी उपजिल्हाधिकारी अशी एकूण ७ उपजिल्हाधिकाºयांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी व निवडणूक उपजिल्हाधिकारी या तीन पदांवरच अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन विभागाचा पदभार उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर रोहयो विभागाचा पदभार सेलू येथील सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आला आहे. निवडणूक विभागाला बिबे हे उपजिल्हाधिकारी कायमस्वरुपी मिळाले आहेत. तर जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय गंगाखेड येथील उपविभागीय अधिकाºयांचे पद ही रिक्त आहे. विशेष म्हणजे येथील तहसीलदार छडीदार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा पदभार सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदारांचे पदही रिक्तच आहेत. या रिक्त पदांचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन ही पदे भरण्याची गरज आहे.
१५ अधिकाºयांच्या बदल्या, तरीही...
राज्य शासनाने ३ एप्रिल रोजी राज्यातील १५ उपजिल्हाधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद येथील अधिकाºयांचा समावेश आहे. परंतु, या यादीत परभणीतील अधिकाºयांचा समावेश नाही. त्यामुळे राज्य शासनाचे परभणीकडे दुर्लक्ष झाले आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: Four posts of Parbhani sub-district officials are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.