खोटे सोने देऊन फसविणाऱ्या चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:48+5:302021-09-27T04:19:48+5:30
गंगाखेड शहरातील डॉ. आंबेडकर चौक भागात गणेश बालासाहेब तनपुरे यांना दोन व्यक्ती भेटल्या. कमी भावात सोने देतो असे, त्यांनी ...
गंगाखेड शहरातील डॉ. आंबेडकर चौक भागात गणेश बालासाहेब तनपुरे यांना दोन व्यक्ती भेटल्या. कमी भावात सोने देतो असे, त्यांनी सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी सोने दाखवले; परंतु ते खोटे वाटत असल्याने तनपुरे यांनी सोने घेण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी तनपुरे यांच्याजवळील ३ हजार रुपये बळजबरीने काढून नकली सोने त्यांना दिले. ही माहिती तनपुरे यांनी पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक एस.पी. पुयड, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, शेख अजहर, हरी खूपसे, संतोष सानप यांनी गंगाखेड शहरात आरोपींचा शोध घेतला. काही वेळातच किशोरलाल भक्ताजी परमार, कानाराम ऊर्फ राहुल भवरलाल बागरी, ईश्वर वालाराम मुंगिया, पन्नाराम कसुवाजी परमार (सर्व रा. राजस्थान) यांना भाजी मंडई भागातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गणेश तनपुरे यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.