जिल्ह्यात साडेचौदा हजार व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:51+5:302021-01-02T04:14:51+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १४ हजार ५१५ व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास असल्याची बाब ...

Fourteen and a half thousand people in the district suffer from high blood pressure | जिल्ह्यात साडेचौदा हजार व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास

जिल्ह्यात साडेचौदा हजार व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास

Next

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १४ हजार ५१५ व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास असल्याची बाब समोर आली असून ८ हजार ७८९ व्यक्ती मधुमेहग्रस्त असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या अनुषंगाने जिल्हाभरात नुकतेच १२ लाख ९१ हजार ९३ व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १४ हजार ७१५ जणांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे समोर आले आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १३७३, जिंतूर तालुक्यातील २ हजार २१८, पालम तालुक्यातील १ हजार २१७, परभणी शहर वगळता ग्रामीण भागातील ३ हजार ४२४, पाथरी तालुक्यातील २ हजार ६६, पूर्णा तालुक्यातील १ हजार ७०३, सेलू तालुक्यातील १ हजार ३८८ आणि सोनपेठ तालुक्यातील ३९१ व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात ८ हजार ७८९ जणांना मधुमेह असल्याची बाब समोर आली आहे. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ९९७, जिंतूर १ हजार ४४८, पालम ६६१, परभणी ग्रामीण १ हजार ९६६, पाथरी १ हजार ११२, पूर्णा ९२५, सेलू ८३२ आणि सोनपेठ तालुक्यातील ३२६ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील १ हजार ५९२ व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे. तसेच १ हजार ५९२ जणांना इतर विविध प्रकारचे गंभीर आजार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Web Title: Fourteen and a half thousand people in the district suffer from high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.