दूध दरवाढीसाठी किसान सभेने केले मोफत दुध वाटप आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:22 PM2018-05-03T15:22:51+5:302018-05-03T15:22:51+5:30
दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले.
परभणी : दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले.
दूध खरेदी केंद्रावर होणारी लूट थांबवून शेतकऱ्यांना आठ दिवसांत पेमेंट रोखीने करावे, सर्व दूध उत्पादकांना कृषी विभागामार्फत पुरेशा प्रमाणात सकस चारा बियाणे, बेने लागवडीसाठीच्या सर्व निविष्टा पुरविण्यात याव्यात, बाजारातील दर व शासकीय दरातील फरक भावांतर योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने रक्कम जमा करावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़
त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले़ निवेदनावर कॉ़ विलास बाबर, कॉ़ लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, राजेभाऊ राठोड, सुरेश काळदाते, भगवान टेकाळे, लक्ष्मण पुरणवाड, हनुमान मोगले, प्रल्हाद भरोसे, अशोक मोगले, भगवान खुपसे, कैलास बिटकर, शिवाजी पांचाळ, मुक्तीराम बोचरे, शेख अब्दुल, कॉ़ राजेभाऊ राठोड, कॉ़ अशोक कांबळे, कॉ़ भीमराव मोगल, उद्धव ढगे यांनी विश्वनाथ खुपसे, राम देशमुख, साहेबराव देशमुख, प्रदीप गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़
पहा व्हिडीओ : परभणीत किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन