परभणी सत्र न्यायालयासमोर पोलिसांनी एकाच दिवसी केले ५० आरोपींना हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:34 PM2018-04-04T18:34:53+5:302018-04-04T18:34:53+5:30
जिल्हा पोलीस दलाने अटक वॉरंट तालीम करण्याची मोहीम सुरू केली असून, २ एप्रिल रोजी ५० आरोपींना वॉरंट बजावून न्यायालयासमोर हजर करण्यात आले़
परभणी : जिल्हा पोलीस दलाने अटक वॉरंट तालीम करण्याची मोहीम सुरू केली असून, २ एप्रिल रोजी ५० आरोपींना वॉरंट बजावून न्यायालयासमोर हजर करण्यात आले़
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपी हजर होत नाहीत़ त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने अटक वॉरंट बजावण्याची मोहीम सुरू केली आहे़
२ एप्रिल रोजी १९ पोलीस ठाण्यांमध्ये मोहीम राबविण्यात आली़ पोलीस अधीक्षक दिलीप झळके व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली़ सत्र न्यायालयातून मिळालेल्या यादीनुसार नॉनबेलेबल वॉरंट, स्टँडिंग वॉरंट, पोटगी वॉरंट व इतर प्रकरणातील ३९ वॉरंट सोमवारी तामील करण्यात आले़ या प्रकरणातील ५० आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले़ ही मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाणार असून, सर्व पोलीस ठाण्यातून दररोज वॉरंट तामीलीसंदर्भात आढावा घेतला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले़