परभणी, पालम, गंगाखेड, पूर्णा येथे मोर्चा : ‘राष्ट्रवादी’चा सरकारवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:02 AM2017-11-30T01:02:10+5:302017-11-30T01:02:20+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन जिल्ह्यात बोंडअळीचे सर्वेक्षण करावे, शेतकºयांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हे मोर्चे काढण्यात आले़ गंगाखेड येथील मोर्चेकºयांनी तहसीलदारांना बोंडअळीग्रस्त कापसाची झाडे भेट दिली़ पूर्णा येथील मोर्चकºयांनी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला़ पालम येथे काढण्यात आलेल्या मोर्चात पदाधिकाºयांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर जोरदार टीका केली़ परभणी येथील मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले़ जिल्ह्यात निघालेल्या या मोर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
परभणी येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़
जिंतूर रोडवरील जामकर महाविद्यालयाच्या प्रांगणातून दुपारी १२ वाजता या हल्लाबोल मोर्चास प्रारंभ झाला़ या मोर्चात माजीमंत्री फौजिया खान, अॅड़बाळासाहेब जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख, विजय जामकर, किरण सोनटक्के, माजी खाग़णेशराव दुधगावकर, अॅड़विष्णू नवले, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, संतोष बोबडे, जलालोद्दीन काजी, महेबुब अली पाशा, संजय कदम, माणिक जेवणार, अशिष हरकळ, मोहम्मद गौस, संग्राम जामकर, गंगाधर जवंजाळ, इम्रान लाला, सुमंत वाघ, रेखा आवटे, किरण तळेकर, सिद्धार्थ भराडे, रमाकांत कुलकर्णी, राजेंद्र वडकर, सुरेंद्र रोडगे, नंदाताई राठोड, नंदकिशोर शिंदे, शंकर भागवत, रामेश्वर आवरगंड, संगीता पवार, गंगासागर वाळवंटे, दिनेश परसावत, मनोज राऊत, जलील पटेल, अॅड़अमोल पाथरीकर, अॅड़रमेश रासवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
पालम- तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी राकाँच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकºयांनी सरकारविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ शहरातील नवा मोंढा भागातील तालुका संपर्क कार्यालयापासून हलगी वाजवित मोर्चाला सुरुवात झाली़ कापसाचे बोंडअळीग्रस्त झाडे हातात घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
गंगाखेड येथे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़ तहसीलदार आसाराम छडीदार यांना शेतकºयांनी सोबत आणलेली कापसाची झाडे भेट देवून निवेदन सादर केले़