परभणीच्या बाजारपेठेत फळे महाग; भाजीपाला स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:50 AM2018-11-16T11:50:51+5:302018-11-16T11:51:27+5:30
भाजीपाला : दुष्काळी परिस्थितीचा परिणाम परभणीच्या फळ आणि भाजीपाला बाजारपेठेवर झाला
दुष्काळी परिस्थितीचा परिणाम परभणीच्या फळ आणि भाजीपाला बाजारपेठेवर झाला असून, फळांची आवक घटल्याने भाव वधारले असून, भाजीपाल्याचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
दुष्काळी स्थितीचा फटका फळबागांना बसून परभणीच्या बाजारपेठेत फळांचे भाव वधारले. महिनाभरापासून आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, भाव वधारले आहेत. डाळिंब ३० ते ६० रुपये किलो, पपई २० ते २५ रुपये किलो, संत्रा १५ ते २५ रुपये किलो अािण मोसंबी ४० रुपये कि. दराने विक्री होत असल्याचे व्यापारी महंमद मुनीर यांनी सांगितले.
भाजी-पाल्याचे भाव स्थिर आहेत. मेथी, कोथिंबीर, सिमला मिरची, पानकोबी, फुलकोबी, टोमॅटो, बटाटे, कांदा असा सर्वच भाजीपाला बाजारपेठेत कमी दरात उपलब्ध आहे. मेथीची भाजी ५ रुपये जुडी या दराने विक्री होत आहे.