रस्ता, स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १७ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:04+5:302021-07-20T04:14:04+5:30
पोखर्णी जिल्हा परिषद सर्कलमधील पेगरगव्हाण येथे जिल्हा परिषदेच्या वतीने जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ६ लाखांचा तर पोखर्णी येथे दलित ...
पोखर्णी जिल्हा परिषद सर्कलमधील पेगरगव्हाण येथे जिल्हा परिषदेच्या वतीने जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ६ लाखांचा तर पोखर्णी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी ११ लाखांचा निधी जिल्हा परिषद सदस्य समशेर वरपूडकर यांनी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन सोमवारी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणा वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पेगरगव्हाणच्या सरपंच विद्या करकडे, विठ्ठल इखे, पिंटू गव्हाणे, तुकाराम वाघ, पं. स. सदस्य माणिकराव वाघ, शेषराव वाघ, प्रसादराव वाघ, गंगाधरराव घुंबरे, अशोक गुरू, लक्ष्मणराव वाघ, परमेश्वर वाघ, गणेशराव वाघ, बाबुराव वाघ, डिगांबर एडके, तुकाराम मडके, ज्ञानोबा वाघ, श्रीनिवास बाबुळकर, बाबुराव वाघ आदींची उपस्थिती होती.