गंगाखेड निवडणूक निकाल: जेलमधून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांचा विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 03:29 PM2019-10-24T15:29:12+5:302019-10-24T15:32:20+5:30

Gangakhed Vidhan Sabha Election Results 2019 : Madhusudan Kendre vs Ratnakar Gutte vs Sitaram Ghandat vs Vishal Kadam दिग्गजांच्या लढतीत गुट्टे यांनी बाजी मारली

Gangakhed Election Results 2019: Madhusudan Kendre vs Ratnakar Gutte vs Sitaram Ghandat vs Vishal Kadam, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | गंगाखेड निवडणूक निकाल: जेलमधून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांचा विक्रमी विजय

गंगाखेड निवडणूक निकाल: जेलमधून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांचा विक्रमी विजय

googlenewsNext

परभणी : शेतकऱ्यांच्या फसवणूक कर्ज प्रकरणात जेलमध्ये असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढविली आणि त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला आहे.

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणात गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे हे जवळपास चार महिन्यांपासून परभणीच्या जेलमध्ये आहेत. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन नाकारला आहे. असे असताना त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. 

रत्नाकर गुट्टे हे रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. रासप हा महायुतीतील घटक पक्ष असताना  गंगाखेडची जागा शिवसेनेकडे गेली. येथून जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यानंतर रासपचे अध्यक्ष महादेव जानकार यांनी भाजपावर टीका करीत गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी जाहीर करुन ते निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जानकार यांनी गुट्टे यांचा प्रचारही केला. गुट्टे हे जेलमध्ये असताना त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे जावई राजाभाऊ फड व जनसंपर्क अधिकारी हनमंत लटपटे यांनी सांभाळली. रत्नाकर मित्र मंडळाच्या माध्यमातून जोरदार प्रचार चालविला. 

२४ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीत गुट्टे यांनी विक्रमी मते मिळवित विजय संपादन केला. गुट्टे यांना ८० हजार ६०५ तर शिवसेनेचे विशाल कदम यांना ६१ हजार ७०९ मते मिळाली. गुट्टे यांनी शिवसेनेचे कदम यांचा १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला.  जेलमध्ये असतानाही निवडून येण्याची किमया रत्नाकर गुट्टे यांनी साधल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.  

असे होते २०१४ चे चित्र :
- डॉ.मधुसूदन केंद्रे :(राष्ट्रवादी काँग्रेस-विजयी)  
- रत्नाकर गुट्टे (रासप -पराभूत)

Web Title: Gangakhed Election Results 2019: Madhusudan Kendre vs Ratnakar Gutte vs Sitaram Ghandat vs Vishal Kadam, Maharashtra vidhan sabha election Results 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.