परभणी जिल्ह्यात गंगाखेड, सोनपेठमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:08 AM2018-04-18T00:08:51+5:302018-04-18T00:08:51+5:30
जम्मूतील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव आणि गुजरात राज्यातील सूरत येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ १७ एप्रिल रोजी गंगाखेड आणि सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित या घटनेचा कडाडून विरोध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड/सोनपेठ : जम्मूतील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव आणि गुजरात राज्यातील सूरत येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ १७ एप्रिल रोजी गंगाखेड आणि सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित या घटनेचा कडाडून विरोध केला.
जम्मू काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरात राज्यातील सुरत येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. देशात मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहेत.
मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील जैदीपुरा भागातील आझाद चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्वधर्माचे समाजबांधव एकत्र आले. आझाद चौकातूनच मोर्चा काढण्यात आला.
नेहरु चौक, भगवती चौक, मेनरोड, दिलकश चौक, डॉ.हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, अदालतरोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, माजी नगराध्यक्ष अॅड.गौतम भालेराव, रामप्रभू मुंडे, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, हाफीज खालेद बागवान, नगरसेवक अॅड.सय्यद अकबर, अॅड. शेख कलीम, सत्यपाल साळवे, प्रमोद मस्के, चंद्रकांत खंदारे, चाँदभाई टेलर, प्रल्हादराव मुरकुटे, नंदकुमार पटेल, बाळकाका चौधरी, बालासाहेब राखे, अॅड.संतोष मुंडे, शेख युनूस, त्र्यंबकराव मुरकुटे, माजी नगरसेवक स. अशफाक, सुनील चौधरी, बालाजी मुंडे, शेख मुस्तफा, अॅड.हनुमंत जाधव, इकबाल भाई गुत्तेदार, बालासाहेब पारवे, अॅड.संदीप आळनुरे, सय्यद चाँद, धनंजय भेंडेकर, शेख खालेद, सुरेश बंगडर, राजू सानप, प्रवीण काबरा, भाऊराव मुंडे, राजेश फड, मगर, पोले, हनुमंत लटपटे, सिद्धार्थ भालेराव, सय्यद जमीरभाई, गोविंद यादव, विशाल दादेवाड, अनिस खान, माधव शिंदे, कैलास दीडशेरे, रोहिदास लांगडे, भीमराव कांबळे आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. नायब तहसीलदार वाय.बी. गजभारे, पोलीस निरीक्षक सोहन माछरे निवेदन देण्यात आले.
बाजारपेठ कडकडीत बंद
घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिली. कडक उन्हाळा व हॉटेल्स बंद असल्याने संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आदी संघटनांनी व व्यापाºयांनी शहरात ठिकठिकाणी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती.
लालसेनेचे निवेदन
कठुवा व उन्नाव येथील बलात्कार करणाºया आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लालसेनेने सोनपेठ तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर मोरे, एकनाथ गंगणे, अश्रोबा शिंदे, तुळशीदास शिंदे, भगवान कांबळे आदींच्या सह्या आहेत.
सोनपेठ शहरामध्ये बंदला प्रतिसाद
याच घटनेच्या निषेधार्थ सोनपेठ शहरातही मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवली होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील टिपू सुलतान चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी चौक मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
४तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात चंद्रकांत राठोड, समियोद्दीन काजी, निलेश राठोड, हाफेज ओसामा, गौस कुरेशी, शिवाजी कदम, रमाकांत राठोड, जावेद शेख, सद्दाम हुसेन, जावेद अन्सारी, इर्शाद कुरेशी, गौस पठाण यांच्यासह हिंदू- मुस्लिम एकता समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.