गंगाखेड तालुक्यात हराभऱ्याचा सर्वाधिक पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:15+5:302020-12-23T04:14:15+5:30

तालुका कृषी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यात रब्बीचे एकूण क्षेत्र २८ हजार ३२५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात आत्तापर्यंत तब्बल ...

Gangakhed taluka has the highest sowing of greenery | गंगाखेड तालुक्यात हराभऱ्याचा सर्वाधिक पेरा

गंगाखेड तालुक्यात हराभऱ्याचा सर्वाधिक पेरा

Next

तालुका कृषी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यात रब्बीचे एकूण क्षेत्र २८ हजार ३२५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात आत्तापर्यंत तब्बल १२ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा करण्यात आला आहे. त्यामध्ये गंगाखेड महसूल मंडळात २ हजार ४९९ हेक्टर, महातपुरी २ हजार ८८८९, माखणी ३ हजार १६५, राणीसावरगाव १ हजार ८३३, पिंपळदरी महसूल मंडळात २ हजार ५२९ हेक्टर असा एकूण १२ हजार ९१५ हेक्टर पेरा झाला आहे. या खालोखाल ज्वारीचा पेरा झाला आहे. त्यात गंगाखेड महसूल मंडळात १ हजार ६२०, महातपुरी २ हजार ५९८, माखणी ३ हजार १६६, राणी सावरगाव २ हजार ८७, पिंपळदरी २ हजार २४० अशी एकूण ११ हजार ७११ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. या शिवाय गहू २ हजार ९२७ हेक्टर, तीळ ३२ हेक्टर, करडी ३६१ हेक्टर, जवस ६१ हेक्टर, गळीत धान्य एकूण ४५५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत गंगाखेड महसूल मंडळात ४ हजार ६५६, महातपुरी ६ हजार २४२, माखणी ७ हजार ३८८, राणीसावरगाव ४ हजार २४३, पिंपळदरी महसुल मंडळात ५ हजार ७९६ हेक्टर पेरा झाला आहे.

Web Title: Gangakhed taluka has the highest sowing of greenery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.