वडी येथे कचरावेचणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:06+5:302021-01-25T04:18:06+5:30
२४ जानेवारी रोजी गावातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत ...
२४ जानेवारी रोजी गावातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामरोजगार सेवक, स्वच्छतादूत यांनी स्वच्छतेविषयी घरोघरी जाऊन जनजागृती करून जलसुरक्षा पाणीपुरवठा यांचे महत्त्व पटवून दिले. शालेय विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक, आशाताई अंगणवाडीताई, मदतनीस, महिला बचत गटाच्या महिला, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पदाधिकारी, सेवाभावी संस्था पदाधिकारी, नेहरू युवा केंद्र युवक, आरोग्य कर्मचारी यात सहभागी झाले होते. गावांमध्ये प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. 'माझे गाव, माझे योगदानातील' युवक, युवती यांनी गावातील प्लास्टिक गोळा करून ते गावाबाहेर ढीग करून त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी करण्यासाठी शिवाजी कुटे, शेळगे, संजय चिंचाणे, अप्पा वडीकर, गावातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.