कचराडेपोत मुलाचा मृतदेह प्रकरण: सेलू नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 12:52 PM2021-11-06T12:52:47+5:302021-11-06T12:53:08+5:30
न.प.प्रशासनाच्या निष्कळजीपणामुळे डंपिंग ग्राउंडच्या खड्यातील पाण्यात बुडुन मुलाचा आपघाती मृत्यू झाल्याचे प्रकरण.
देवगावफाटा (परभणी) : सेलू नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कचराडेपो मधील खड्यातील घाण पाण्यात बुडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचा दुर्देवी प्रकार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वा सुमारास उघडकीस आला.या प्रकरणी नगर परिषदेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि ठेकेदार यांचे विरूध्द सेलू पोलीस ठाण्यात रात्री १०:२६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू येथील घिसेगा नगर परिसरात विटभट्टीवरील कामगार शेरखाँ पठाण यांचा ९ वर्षीय रिहाण शेरखाँ पठाण या मुलाचा मृतदेह न.प.च्या डंपिंग ग्राउंड च्या खड्यात घाण पाण्यावर तरंगतांना आढळून आला. त्यानंतर नागरीकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणुन न.प.विरोधात गुन्हा दाखल करावा व संबधीत पिडीत कुटुंबास आर्थसहाय्य द्यावे या मागणीसाठी आर्धातास ठिय्या आंदोलन केले.त्यानंतर पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी शेवविच्छेदन व अंत्यसंस्कार करून घ्या नंतर संबधीत दोषीविरूध्द गुन्हा दाखल करून घेतो असे आश्वासन दिल्यानंतर रिहाण पठाण यांचे शेवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले .मयत रिहाण पठाण चे वडील शेरखान आक्रम पठाण यांचे फिर्यादीवरून नगर परिषद संबधीत अधिकारी व कर्मचारी आणि ठेकेदार यांचे विरूध्द रात्री १०:२६ वा.गुन्हा दाखल करण्यात आला.या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की,४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा.रेहाण पठाण हा खेळण्यासाठी घरामधुन बाहेर गेला. बराच वेळाने तो परत न आल्याने त्याचा घिसेगा नगर व सेलू शहरात त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही.५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वा.माझी पत्नी व गल्लीतील नागरिक शेख अजिज,शेख तौफिक, शेख ताहेर,शेख अजिजखान हे शोध घेतांना घराच्या बाजुला असलेल्या नगर परिषद डंपिंग ग्राउंड च्या खड्यात रिहाण पठाण चा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसुन आला.
या घटनेची माहिती पोलीसांना दिली. सदर नागरीकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढुन सरकारी दवाखान्यात शेवविच्छेदन केले. नगर परिषद डंपिंग ग्राऊंडला कुंपन किंवा कंपाउंड वाल नाही.तसेच धोकादायक क्षेत्र असल्याचा फलक नाही.व ते सुरक्षा रक्षक ड्युटीवर नसल्याने नगर परिषद संबधीत अधिकारी ,कर्मचारी व ठेकेदार यांचा ढिसाळ कारभार व निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाचा आपघाती मृत्यू झाला या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात संबधीत अधिकारी ,कर्मचारी व ठेकेदार यांचे विरुद्ध कलम ३०४ अ ,३४ भांदवी कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड हे करीत आहेत.या घटनेबद्दल सेलू शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तपासातून आरोपींची नांवे येतील समोर...
सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असुन न.प.प्रशासनाकडे चौकशी करण्यात येईल.यामधून संबधीत ड्युडीवर कोण कर्मचारी आहे.नियंत्रण अधिकारी कोण व ठेका कोणाकडे आहे अशी चौकशी पुर्ण झाल्यानंतर आरोपीची नांवे समोर येतील असे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
डंपिंग ग्राऊंड ईतरत्र हलविण्याचा प्रश्न ऐरणीवर..
घिसेगा नगर व राजमोहल्ला परिसरालगत सेलू नगर परिषदेचे डंपिंग ग्राऊंड आहे. येथे शहरातील सर्व कचरा रस्त्यावर व ईतरत्र आस्थाव्यस्थ पडलेला आसतो.हा कचरा सतत जाळला जात असल्याने येथे नेहमी धुर व दुर्गंधी असते परिसरातील नागरीकांना त्रास होत आहे. शिवाय आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. बाजुला महावितरण चे उपकेंद्र देखील आहे.हे डंपिंग ग्राऊंड ईतरत्र हलवावे अशी या भागातील नागरीकांनी ४० वेळा निवेदनाद्वारे न.प.कडे मागणी केली होती.विशेषतः तात्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी हे डंपिंग ग्राऊंड करीता हादगांव पावडे शिवारात ३ एकर जागा देऊन तेथे डंपिंग ग्राउंड करण्यास मंजुरी दिलेली होती.पण याकडे न.प.प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिणामी एका मुलाचा बळी गेला आहे.त्यामुळे डंपिंग ग्राउंड ईतरत्र हलविण्याचा प्रश्न आत्ता पुन्हा ऐरणीवर आला आहे.