गंगाखेडमध्ये गीताने घेतला माता-पित्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:23 AM2020-12-30T04:23:03+5:302020-12-30T04:23:03+5:30

सुमारे २० वर्षांपूर्वी मूकबधिर गीता आई-वडिलांपासून विभक्त होत पाकिस्तानमध्ये पोहोचली होती. तिला परत भारतात आणल्यानंतर आता ती आपल्या गावाचा ...

Geeta searches for parents in Gangakhed | गंगाखेडमध्ये गीताने घेतला माता-पित्यांचा शोध

गंगाखेडमध्ये गीताने घेतला माता-पित्यांचा शोध

Next

सुमारे २० वर्षांपूर्वी मूकबधिर गीता आई-वडिलांपासून विभक्त होत पाकिस्तानमध्ये पोहोचली होती. तिला परत भारतात आणल्यानंतर आता ती आपल्या गावाचा आणि जन्मदात्यांचा शोध घेत आहे. गीता पाकिस्तानमध्ये पोहोचली त्यावेळी ८ वर्षांची होती. गीता लहानपणी ज्या ठिकाणी राहत होती, तेथे रेल्वेस्थानक व त्याजवळील नदीवर पूल आणि त्याच्या आजू बाजूला उसाची व शेंगाची शेती होती, असे गीताने सांगितले आहे. त्यामुळे इंदोर येथील आनंद सर्व्हिस सोसायटी या सामाजिक संस्थेचे ग्यानेन्द्र पुरोहित, इंदोर रेल्वेच्या महिला पोलीस कर्मचारी साधना बघेल, परभणी येथील पहेल फाउंडेशनचे अनिकेत सेलगावकर आदी मंडळी मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरात दाखल झाली. स्थानिक रेल्वे पोलीस मोईन पठाण यांच्या मदतीने त्यांनी गीताला रेल्वे स्टेशन परिसर, गोदावरी नदी पूल, नदी काठावरील मंदिर परिसर आदी ठिकाणे दाखविले.

जिंतूर येथील एक मुकबधीर मुलगी २० वर्षांपूर्वी बेपत्ता झाली असल्याचे एका महिलेने या पथकाला गंगाखेडमध्ये सांगितले. त्यावरुन जिंतूर येील मुलीच्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधण्यात आला. नातेवाईकांना गीताबद्दलची माहिती देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व पोलीस कर्मचारी गीताला सोबत घेऊन नातेवाईकांची पडताळणी करण्यासाठी जिंतूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता जिंतूर येथील या नातेवाईकांकडून काेणती माहिती मिळते, याची आशा गीताला लागली आहे.

Web Title: Geeta searches for parents in Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.