परभणीत अंशकालीन पदवीधरांचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:44 AM2018-05-03T00:44:58+5:302018-05-03T00:44:58+5:30
मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़
कंत्राटी पद्धतीने धोरणात्मक निर्णयानुसार अंशकालीन पदवीधरांना शासनाच्या निमशासकीय, शासकीय, निवडणूक विभाग, जिल्हा परिषद, वित्त महामंडळ, महानगरपालिका, पालिका या ठिकाणी नियुक्तीस प्राधान्य देण्यात यावे, अंशकालीन पदवीधरांच्या १८ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित मागण्या तत्काळ सोडाव्यात आदी मागण्यांसाठी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले़ या आंदोलनात गुणीरत्न वाकोडे, संजय पांडे, डी़ आऱ गवई, प्रा़ शिवाजी लहाने, अविनाश निकम, पप्पू नरवाडे, गणेश वाटोडे, शिवराम राठोड, कैलास सावंत, सुरेश खरात, मनोज लोकरे, सुरेश भालेराव, रविंद्र चव्हाण, सुधीर माहूरकर, अर्जुन शेळके, दीपक मगर, मारोती चांडक, भगवान भालेराव आदींचा समावेश होता़