परभणीत वाळुसाठी घरकुल लाभार्थ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:50 PM2019-02-11T17:50:46+5:302019-02-11T17:52:49+5:30
रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत शहरातील लाभधारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़
परभणी- रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत शहरातील लाभधारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़
परभणी शहरात महानगरपालिकेंतर्गत रमाई घरकूल योजनेत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे या लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी अनुदानाचा पहिला हप्ताही अदा करण्यात आला़ मात्र बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय झाली आहे़ घरकूल बांधकामांना वाळू द्यावी, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ परंतु, तरीही प्रशासन वाळू उपलब्ध करून देत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ केवळ वाळुअभावी घरकूल बांधकामे रखडली आहेत़ तेव्हा रमाई घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत शहरातील अनेक लाभार्थ्यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला़ या आंदोलनामध्ये लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़