पाकिस्तानातून परतलेली गीता परभणीत घेतेय कुटुंबियांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:53+5:302020-12-29T04:14:53+5:30

आनंद सेवा सोसायटी घेत आहे काळजी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदूरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जात आहे. या ...

Gita returns from Pakistan and searches for her family in Parbhani | पाकिस्तानातून परतलेली गीता परभणीत घेतेय कुटुंबियांचा शोध

पाकिस्तानातून परतलेली गीता परभणीत घेतेय कुटुंबियांचा शोध

Next

आनंद सेवा सोसायटी घेत आहे काळजी

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदूरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जात आहे. या स्वयंसेवी संस्थेवर गीताच्या आई-वडिलांचा शोध घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गीताच्या हावभावावरून आणि इशाऱ्यानुसार तिने काही भागांसंबंधी संकेत दिले आहेत. त्यानुसार तिच्या मूळगावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावेत. दरम्यान तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनविले जातात. लहानपणीच्या पुसट आठवणीनुसार गीताने गावाजवळ एक रेल्वेस्थानक असल्याचे सांगितले आहे. तसेच नदी वाहत असल्याचे सांगितले. त्यानुसार सुरुवातीला नांदेड, जालना रेल्वेस्थानक परिसरात तसेच तेलंगणाच्या सीमा भागात तिच्या कुटुंबियांचा शोध घेण्यात आला आहे.

चुकून पोहोचली होती पाकिस्तानात

गीता सध्या ३० वर्षांची असून, ती बालपणी चुकून रेल्वेत बसून पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली. तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ती भारतात परत आली. त्यानंतर तिने या विविध भागांत कुटुंबियांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Gita returns from Pakistan and searches for her family in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.